विविध भाषिक खेळ मुलांना सांगण्यासाठी जरूर पहा.. भाषिक खेळ
१)- समान अर्थ व जोडशब्दांची ओळख. हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . उदा.-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार.
1.फायदा+नुकसान 2.वडील+मुलगा 3.विवाह+काम 4.दिनांक+दिवस 5.शरीर+शिक्षा 7.राहणे+घर याप्रकारे शब्दांच्या जोडया देऊन खेळ घेता येतो.
२) खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका शब्दात आणि मराठीमध्ये असावीत …. पण त्या शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू नये.. अवधि – 1तास
उदाहरणार्थ : मुलाचे नाव – मदन 1. गावाच नाव - फलटण 2. मुलीचं नाव - पलक 3. आडनाव - करमरकर 4. धातू - कनक 5. फूल - कमळ 6. फळ - फणस 7. झाड - वड, पळस 8. गोड पदार्थ - खरवसाचा 9. वस्तू - कढई 10. पूजा साहित्य - तबक 11. दागिना - नथ 12. हत्यार - करवत 13. पक्षी - बदक 14. प्राणी - अस्वल, मगर 15. नदी - सतेज
3. उद्देश :- शब्दातील परस्परसंबंध जाणून त्यांना क्रमाने लावणे.
No comments:
Post a Comment